Thackeray Group Protest: किरीट सोमैयांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक; सोमैयांच्या प्रतिमेला 'जोडेमारो आंदोलन' - Jode Maro Andolan to Kirit Somaiya
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा : भाजपचे नेते किरीट सोमैया यांचे कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून किरीट सोमैयांचा निषेध करण्यात आला आहे. बुलडाणा शहरात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या प्रतिमेला 'जोडेमारो आंदोलन' करत त्यांचा निषेध केला आहे. महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करण्याचे काम किरीट सोमैया यांनी केले आहे. यासाठी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आरोपांची राळ उडवून देण्यासाठी किरीट सोमैया ओखळले जातात. भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांवर आतापर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. ईडी, सीबीआयकडे त्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अनेक नेते राजकीयदृष्टया अडचणीत आले. किरीट सोमैयां यांनी भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे. जे सोमैया विरोधकांवर तुटून पडत होते तेच आता अडचणीत सापडले आहेत. त्यांचा एक कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटीझन्सकडून देखील प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.