JCB tyre burst in Raipur : रायपूरमध्ये जेसीबीत हवा भरताना फुटला टायर ; हवेत 8 फूट उंच उडून दोन जणांचा मृत्यू - JCB tyre burst in Raipur
🎬 Watch Now: Feature Video

रायपूर - छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दुर्घटना ( JCBs tyre burst in Raipur ) घडली आहे. जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना टायर फुटला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला ( tyre burst in Raipur ) आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ही घटना आहे रायपूरच्या सिलतारा भागात घडली आहे. येथील घरकुल स्टील प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये हा ( Gharkul Steel Pvt Ltd ) अपघात झाला आहे. स्फोट इतका जोरदार होता की गॅरेजमधील कर्मचारी सुमारे 8 फूट उंचीवरून हवेत उडाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिलतारा चौकीचे प्रभारी राजेश जॉन यांनी सांगितले की, मृतांमध्ये राजपाल सिंग आणि प्रांजल नामदेव यांचा समावेश आहे. दोघेही मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage of JCB tyre bust ) मिळाले आहे. त्यात टायर फुटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. दोघांचा मृत्यू टायरमध्ये हवा भरताना टायर फुटून झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST