Bus Accident News: ओव्हरटेक करणे पडले महागात! बस पुलावरून खाली कोसळल्याने ३५ प्रवासी जखमी - भीषण अपघात

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 9, 2023, 1:21 PM IST

जालना : पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. मंठा जालना रोडवर हा अपघात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास  घडला आहे. मंठा जवळील केंधळी येथील पूलाखाली ही बस कोसळली आहे. या ठिकाणी नवीन पूलाचे काम सुरू आहे. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस पुलावरून खाली कोसळून पुलाखालील खड्ड्यात गेली. या बसमध्ये 42 प्रवासी होते. 35 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातातील काही जखमी प्रवाशांवर मंठा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.  तर 14 प्रवाशांवर जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील सर्व जखमींची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.