thumbnail

By

Published : Dec 3, 2022, 1:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ETV Bharat / Videos

Ritually Buried Monkey हाच तो पुरोगामी महाराष्ट्र? पाहा शासकीय कार्यालयाच्या परिसरात माकडाचा दफनविधी, जिल्हा कृषी अधीक्षकाचा प्रताप

चंद्रपूर महाराष्ट्राला शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांची परंपरा आहे. म्हणूनच हे राज्य पुरोगामी समजले जाते. प्रत्येक गोष्टीची सखोल चिकित्सा करून ते आत्मसात करण्याची सचोटी याच प्रेरणेतून आली. मात्र काही लोक उच्च शिक्षित असूनही या वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करतात. असाच एक प्रकार समोर आलाय तो जिल्हा कृषी अधीक्षक District Agriculture Superintendent कार्यालयात. रस्त्यावर अपघातात दगावालेल्या माकडाला जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे Bhausaheb Barhate यांनी शासकीय कार्यालयाच्या परिसरात विधीवत दफन Ritually Buried Monkey केले. त्यावर दगड ठेवून शेंदूरही फासला. आता मंदिर बांधण्याची तयार सुरु केली आहे. येत्या दोन दिवसात या माकडाचे श्राद्ध घालण्याचे प्रयोजनही आहे. यासाठी सहकारी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी सुद्धा उकळली जात असल्याची चर्चा आहे. भाऊसाहेब बऱ्हाटे असे या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे सध्या साहेबांचे माकड प्रेम कृषी विभागात चर्चेचा विषय झाला आहे. एखाद्याची श्रद्धा कुणावर असू शकते. त्याला विरोध नाही. परंतु शासकीय कार्यालयात अवैज्ञानिक गोष्टींना प्रोत्साहन देणे ही गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी buried monkey in premises of government office दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.