Israeli Consul General Kobbi Shoshani : 'हमासला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवू', इस्रायलच्या काउन्सिल जनरलचा इशारा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 11, 2023, 5:57 PM IST
|Updated : Oct 11, 2023, 6:28 PM IST
मुंबई : पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासनं शनिवार, ७ ऑक्टोबरला इस्रायलवर अचानक हल्ला केला. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात गाझामध्ये आतापर्यंत सुमारे ११०० जणांचा मृत्यू झाला असून ५००० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील इस्रायलचे काउन्सिल जनरल कोबी शोशानी यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत करताना इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. या हल्ल्यात इराण आणि हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचं कोबी म्हणाले. आमच्या नागरिकांवर घरात घुसून जो अत्याचार झाला, त्याची मोठी किंमत 'हमास'ला मोजावी लागेल. आम्ही हमासला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवू, असा इशारा कोबी शोशानी यांनी दिला. तसंच इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित असून तेल अवीवमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधला जात असल्याची माहिती कोबी शोशानी यांनी दिली.