भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी गुडलक चौकात भव्य रांगोळी तर मनसेकडून दुग्धाभिषेक, पहा व्हिडिओ - रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 2:21 PM IST

पुणे Cricket World Cup 2023 : गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडं संपूर्ण देशाचचं नव्हे तर जगाच लक्ष लागलंय. जगभरात या विश्वचषक फायनलसाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी भारतीय संघासाठी पूजापाठ करण्यात येत आहे तर काही ठिकाणी क्रिकेटर्सच्या फोटोजवर दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात व्हिजन सोशल फाउंडेशनच्या वतीनं भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. तसंच या रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या प्रतिमेवर 100 लिटर दुधानं दुग्धाभिषेक करण्यात आलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.