Dog Wearing Helmet : पुण्यात वाहतूक पोलिसाने घातले श्वानाला हेल्मेट; पाहा व्हिडिओ - श्वानाला हेल्मेट व्हिडिओ व्हायरल
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही मजेशीर तर काही धक्कादायक, पण सध्या पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि सांगाल पुण्यात काय नाही. हेल्मेट जनजागृतीसाठी पोलिसांनी अनोखी पद्धत अवलंबली आणि आपल्या पाळीव कुत्र्यांना हेल्मेट घालून जनजागृती केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकर नागरिक, हेल्मेट सक्ती असा विरोधाभास हा हेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवसापासून ते आत्ता पर्यंत पाहायला मिळत आहे. पुण्यात पुणेकर नागरिकांनी नेहेमीच हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे. आजही हजारो कोटींचा दंड हा पुणेकर नागरिकांवर असून हेल्मेट बाबत पोलिसांकडून विविध उपाययोजना या केल्या जात आहे. आशातच पुण्यातील एका वाहतूक पोलिसाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. हा वाहतूक पोलीस हेल्मेट जनजागृती करण्यासाठी आपल्या जवळ असलेल्या श्वानालाही हेल्मेट घालून जनजागृती करतो आहे. पुण्याच्या वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकाना हेल्मेट घालण्याच आवाहन करण्यासाठी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घालून जनजागृती करण्यास सुरवात केली आहे.