कुत्रे भुंकत असतात, हत्ती चालत असतो; 'हिंदुस्थानी भाऊ'चा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा - Hindustani Bhau News
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 7, 2024, 1:33 PM IST
शिर्डी Hindustani Bhau on Jitendra Awahd : आपल्या रोखठोक बोलण्याकरिता परिचीत असलेल्या हिंदूस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधत जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधलाय. अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम हे मांसाहारी होते, असा वादग्रस्त दावा केला होता. यावर हिंदुस्थानी भाऊंनी त्यांची वाट लावणार असल्याचं वक्तव्य केलं. जे जे सनातन धर्म आणि देवी-देवतांविरोधात टीका टिप्पणी करत आहेत. त्यांची परिस्थिती कुत्र्यापेक्षा वाईट होणार आहे. विरोधात बोलणारे समोर येवून बोलत नाही. समोर बोलल्यावर कळेल की खरा मर्द कोण आहे. कुत्रे भुंकत असतात. मात्र हत्ती चालत असतो अशा भाषेत त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा समारचार घेतलाय. प्रभू श्रीरामाचं मंदिर सर्वासाठी खुलं होत आहे. त्या दिवशी सर्वात मोठी दिवाळी असणार असल्यांचही त्यांनी म्हटलंय.