Video: डान्स करताना कोसळून झाला मृत्यू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Video
🎬 Watch Now: Feature Video
सिरमौर: हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील गिरिपार भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डांन्स करत असताना एका व्यक्तीची कोसळून अचानक मृत्यू झाला आहे. गेल्या रविवारी ढोरी पंचायतीच्या रुहाना गावात जागर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थ 'रासा' हे पारंपरिक लोकनृत्य सादर करत होते. दरम्यान, चेतराम शर्मा नावाचे वय 75 वर्षांचे वृद्ध अचानक जमिनीवर पडले. त्यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी चेतराम शर्मा यांना स्थानिक दवाखान्यात नेले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर चेतराम यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील ज्येष्ठ हरिचंद शर्मा यांनी सांगितले की, रविवारी दुपारीच अंतिम संस्कार करण्यात आले, कारण त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे हा परिसर अतिदुर्गम असून येथील रस्ते, आरोग्य यांसारख्या सुविधा गावकऱ्यांसाठी दूर आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार चेतराम यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.