Himachal Accident News: कंटेनर 150 मीटर खड्ड्यात कोसळला, एकाच कुटुंबातील तीन जणांसह 6 जणांचा मृत्यू - एकाच कुटुंबातील तीन जणांसह 6 जणांचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18504516-thumbnail-16x9-dhm.jpg)
धर्मशाला (हिमाचल) : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धरमशालापासून 3 किमी अंतरावर असलेल्या उथडाग्रनमध्ये एक कंटेनर 150 मीटर दरीत कोसळला. या अपघातात कंटेनरमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर, २ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या कंटेनरमध्ये लोक गव्हाची काढणी करून तो घेवून जात होते. यातील 3 लोक एकाच कुटुंबातील होते अशीही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंटेनरमध्ये लोक गव्हाची कापणी करून त्यात गहू भरत होते. मात्र, उथडागरण जवळील अप्रोच रोडवर कंटेनर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या जवळपास 150 मीटर खाली पडला. त्यामुळे, 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 3 जखमी महिलांचा तांडा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील 3 जण एकाच कुटुंबातील असून, आता या कुटुंबामागे एकच 11 वर्षाचा मुलगा राहिला असून, त्याच्यावर तांडा मेडिकल कॉलेज तांडा येथे उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि सुमारे 9 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.