Mumbai Heavy Rain मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात; जोरदार पावसाची शक्यता - Maharashtra rainfall
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मुंबईत गणेश विसर्जन दरम्यान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला होता. मुंबईत Mumbai Heavy Rain आजपासून पुढील 3 दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार आज बुधवारी सायंकाळी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. Maharashtra Rain अचानक पाऊस पडल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. ७ सप्टेंबर रोजी ४ वाजता हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. Heavy rain alert for parts of Maharashtra पालघर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ Maharashtra rainfall आणि प्रतीतास 30 ते 40 किलो मिटर वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST