Gulabrao Patil On Girish Mahajan : 'मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार', गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी - मंत्री गुलाबराव पाटील
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 16, 2023, 2:07 PM IST
|Updated : Oct 16, 2023, 4:13 PM IST
जळगाव Gulabrao Patil On Girish Mahajan : जळगावातील मातोश्री वृद्धाश्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून आपल्या विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 'मी गिरीश भाऊपेक्षाही मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्याचे मंत्री मला काय घेणं देणं.. गिरीश भाऊंना नेहमी मोठ-मोठी खाती मिळतात. मात्र मी ज्या मतदार संघात राहतो, त्या मतदार संघात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आहे. या ठिकाणी जैन उद्योग समूहाच्या दोन कंपन्या आहेत. केशव स्मृती प्रतिष्ठान सुद्धा याच मतदार मतदारसंघात आहे. त्यामुळं मी स्वतःला मोठा आमदार समजतो', असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच यावेळी 'तेरे पास क्या है तो मेरे पास माॅं है' हा डायलॉग सुद्धा संदर्भ देताना त्यांनी ऐकवला. या डायलॉगला उद्देशून व्यासपीठावर उपस्थित मंत्री गिरीश महाजन यांनीही पद्मश्री भवरलाल भाऊ हमारे तालुके से है, असं उत्तर दिलं. दरम्यान, यावेळी उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाल्याचं पाहायला मिळालं.