Gulabrao Patil सुषमा अंधारे हे तर राष्ट्रवादीचे पार्सल.. गुलाबराव पाटलांची टीका - सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट
🎬 Watch Now: Feature Video
Gulabrao Patil Criticism जळगाव उरली सोडलेली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा अंधारे हे पार्सल इकडे आले आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या या पार्सलपासून सावध रहा, राष्ट्रवादीचे हे पार्सल तुमच्या पक्षाला डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गटाच्या उपनित्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी असून सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी केली आहे. दरम्यान उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीने हे पार्सल इकडे पाठवले असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या या पार्सलपासून सावध राहावे, अन्यथा राष्ट्रवादीचे हे पार्सल तुमच्या पक्षाला डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST