Ganeshotsav २०२३ : राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष; सकाळी पार पडली मुंबईच्या सिद्धिविनायकाची आरती - मुंबईतील गणेशोत्सव
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 19, 2023, 6:58 AM IST
|Updated : Sep 19, 2023, 7:04 AM IST
मुंबई : Ganeshotsav २०२३ : आज गणरायाच्या आगमनाचा दिवस आहे. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आज घराघरात मोठ्या जल्लोषात स्वागत होईल. ठिकठिकाणची सार्वजनिक मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. गणेशाच्या स्थापनेसाठी आज सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त आहे. या काळात केव्हाही गणपतीची स्थापना करता येईल. मुंबईतील गणेशोत्सव हा विशेष असतो. कधीही न थांबणाऱ्या मुंबई नगरीत हे दहा दिवस सर्वात धामधुमीचे असतात. मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती हा मुंबईकरांचा आराध्य दैवत आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवारी (१९ सप्टेंबर) पहाटे गणेश चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात आरती झाली. या आरतीसाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. चला तर मग पाहूया गणेश चतुर्थी निमित्त सिद्धिविनायकाच्या आरतीचा हा व्हिडिओ..