Ganeshotsav 2023: परळचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग, पाहा व्हिडिओ - Paralcha Raja Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 24, 2023, 10:08 PM IST
|Updated : Sep 25, 2023, 2:40 PM IST
मुंबई Ganeshotsav 2023: परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 77 वे वर्ष आहे. 23 फुटी गणपती बाप्पाची इंद्र रुपातली मूर्ती साकारण्यात आलीय. ऐरावतावर विराजमान झालेला इंद्ररुपी गणपती बाप्पा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलीय. त्याचप्रमाणं या मंडळाचं सामाजिक कार्य देखील मोलाचं आहे. या मंडळानं बाप्पाच्या आगमनाच्या वेळी स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यांनी रस्त्यावरील प्लास्टिक जमा केलं होतं. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मितीचा उपक्रम देखील राबवण्यात येतोय. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर राबवून समाजकार्याला हातभार लावण्याचं मोठं कार्य केलं जातंय. याबाबत सविस्तर माहिती मंडळाचे सचिव सुबोध रासम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. (Paralcha Raja Mumbai)