Ganeshotsav 2023 : ‘गणपती माझा नाचत आला'; मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीचा जल्लोष...पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 2:42 PM IST

thumbnail

पुणे  Ganeshotsav 2023 : 14 विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचे आज (Ganesh Festival 2023) आगमन होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. सकाळपासूनच नागरिकांनी रस्त्यावर गर्दी  केली आहे. पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पालखीत 'श्री' ची आगमन मिरवणूक (Kasba Ganapati Ganapati Miravnuk) पार पडली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे 'गणपती बाप्पा मोरयाच्या' जयघोषाने ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दहा दिवसांच्या या मंगलमय उत्सवासाठी पुण्यनगरी (Pune Ganesh Festival) सज्ज झाली आहे.

गोसावी महाराज यांच्याहस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा : पुण्यातील मानाचा पहिला 'श्री कसबा गणपती' ची (Kasba Ganapati) मिरवणूक सकाळी आठ वाजता उत्सव मंडपातून निघाली होती. ढोल ताशांचा गजर तसंच प्रभात बँडच्या वतीने सनई वादन करत मोरया मोरयाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते 'श्री' प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.