Ganesh Visarjan २०२३ : पुण्यातील विसर्जन मार्गावर रांगोळी; पाहा काय आहे थीम - गणेश विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 28, 2023, 10:17 AM IST
पुणे : Ganesh Visarjan २०२३ : दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव (Ganpati Festival 2023) साजरा करून आज सर्वजण बाप्पाला निरोप देत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणूक जाते. अशाच पुण्यातील विसर्जन मार्गांवर राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रांगोळी काढण्यात येते. यंदाच्या वर्षी सायबर क्राईम (Cyber Crime Rangoli) ही थीम घेऊन विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीतर्फे रांगोळी काढण्यात आली आहे. विसर्जन मार्गावर (Visarjan Route) ठिकठिकाणी सायबर क्राईमशी निगडित विविध संदेश देणाऱ्या रांगोळी काढण्यात आल्या आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. सुरुवातीला मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार असुन, त्यानंतर इतर सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात येणार आहे.