Ganesh Visarjan २०२३ : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पाहा यंदाची राजाची शेवटची आरती - Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 28, 2023, 12:47 PM IST
मुंबई : Ganesh Visarjan 2023 : दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता आज म्हणजेच अनंत चतुर्दशीला होत आहे. लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) विसर्जन मिरवणूक निघत असून, या विसर्जनाच्या मिरवणुकीपूर्वी उत्तर पूजा करूनआपल्या लाडक्या राजाला निरोप देताना आरती केली जाते. या आरतीत हजारो भाविक सामील होतात. या आरतीनंतर (Lalbaugcha Raja Ganpati Aarti) लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना झाला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी (Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk) पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणूकांवर (Lalbaugcha Raja Visarjan) पोलिसांचं विशेष लक्ष आहे. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होत असतात. त्याकरता विशेष व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.