Ganesh Visarjan 2023: श्रीगणेशाच्या जयजयकारात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणरायांना निरोप; पहा ड्रोन व्हिडिओ - गणेश विसर्जन 2023
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 28, 2023, 9:25 PM IST
|Updated : Sep 28, 2023, 10:42 PM IST
पुणे Ganesh Visarjan 2023: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdusheth Halwai Ganpati Mandal), सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणुकीला (Dagdusheth Halwai Ganesh Immersion) अनंत चतुर्दशीला म्हणजेच आज दुपारी साडेचार वाजता भर पावसात सुरुवात झाली. (Ganesh Festival 2023) यावेळी गणेशाच्या जयजयकारात भाविकांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे स्थापित गणरायांना निरोप दिला. यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघालेला आहे. (Farewell to Ganaraya in Pune)
मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री पार पडत होती. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले होते. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत राहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून यावर्षी दुपारी साडेचार वाजल्याच्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यंदा लवकरच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक काढली असल्याने रात्री 7 वाजल्याच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या उत्साहात नागरिकांनी बाप्पाचे स्वागत केलं आहे. पाहूया या क्षणाचा ड्रोन व्हिडिओ...