Ganeshotsav 2023 : ताशा तर्रारररला ढोलही वाजला! गणरायाच्या आगमनाचा जल्लोष; पुण्यातील ढोल-ताशा पथकं सज्ज - पुण्यातील ढोल ताशा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 18, 2023, 11:55 AM IST
पुणे : Ganeshotsav 2023 : लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन १९ सप्टेंबरला (Ganesh Chaturthi 2023) होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणेशाचं स्वागत करण्यासाठी सर्व आतुर झाले आहेत. पुण्यातला गणेशोत्सव (Pune Ganesh Festival 2023) हा मुख्य आकर्षणाचा विषय असतो. जगभर पुण्यातल्या ढोल- ताशा पथकांचं वादन (Dhol Tasha Pathak) पाहण्यासाठी लोक पुण्यात येत असतात. या ढोल-ताशा पथकामध्ये एक मुख्य आकर्षण असणारा ढोल ताशा पथक आहे ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांचं 'कलावंत ढोल-ताशा पथक'.
'कलावंत ढोल ताशा पथक' : खरंतर गणपती हा कलेचा देवता मानला जातो. कलाकारसुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून गणपतीची आराधना करत असतात. आपली भक्ती व्यक्त करता यावी यासाठी हे ढोल-ताशा पथक गेल्या दहा वर्षापासून पुण्यातल्या गणेशोत्सवात सहभागी होतंय. तर मुख्य आकर्षण असलेल्या या ढोल-ताशा पथकाची तयारी पूर्ण झाली आहे.
कलाकारांचा असणार सहभाग : नेहमी टीव्हीमध्ये, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या मालिकांमध्ये दिसणारे चेहरेसुद्धा आपली कला गणेशापुढं सादर करतात. नेहमी प्रसिद्धझोतात आणि व्यस्त असणारे हे कलाकार मात्र पुण्यातल्या गणेश उत्सवामध्ये सहभागी होतात. कलाकार हे 'कलावंत ढोल पथकाच्या' माध्यमातून रस्त्यावर येऊन ढोल वाजवून गणेशाची भक्ती करतात. या कलावंत पदकाला बघण्यासाठी पुणेकर भक्त प्रचंड प्रमाणात गर्दी करतात.