Video : पवार साहेब लाखांचे पोशिंदे; धमकी देणाऱ्याविरोधात कठोर कारवाई व्हावी - राजेश टोपे - माजी मंत्री राजेश टोपे
🎬 Watch Now: Feature Video
जालना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार NCP Sharad Pawar यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी आरोपीने फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी Sharad Pawar Death threat दिली होती. यावर माजी मंत्री राजेश टोपे Former Minister Rajesh Tope यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की, शरद पवार साहेब लाखांचे पोशिंदे आहेत. कारण एक म्हण आहे की, लाख मरावे पण पोशिंदा जगला पाहिजे. ही महत्वाची बाब आहे. यामुळे शरद पवार साहेब यांना दिलेली धमकी सरकारने गांभीर्याने घेऊन धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. शरद पवार यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्याची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान ते महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर म्हणाले की, दोन्ही राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने येथील हिंसा थांबली पाहिजे व समन्वयाने सीमावाद मिटला पाहिजे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST