Chandrakant Khaire : शिंदे-फडणवीस शासनावर चंद्रकांत खैरेंची टीका; म्हणाले... - चंद्रकांत खैरेंजी शिंदे फडणवीस सरकारवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
जालना: शिंदे आणि फडणवीस यांची जोडी दुष्ट असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. मंत्री तानाजी सावंत यांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आम्ही बंडाळी केल्याचा गौप्यस्फोट केला. सावंतांच्या या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना खैरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे पाप या जोडीने केले. त्यामुळे यांच्या बरोबर गेलेले लोकही दोषी असल्याचे खैरे यांनी म्हटले.
तर मूग गिळून का गप्प बसले? आता आम्ही सोशल मीडियावर न म्हणता तोंडाने '50 खोके. एकदम ओके' म्हणू अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. मात्र माजी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करूनही शिंदे-फडणवीस हे दोघेही राज्यपालांविरुद्ध मूग गिळून का गप्प बसले? असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थित केला. सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, अशी प्रार्थना मी राजुरेश्वराला केली असल्याचही खैरे म्हणाले.