Pune Crime : चतु:श्रृंगी परिसरामध्ये गोळीबार, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

By

Published : Apr 18, 2023, 6:48 PM IST

thumbnail

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी तर शहरात मोठ्या प्रमाणावर कोयता गँगकडून दहशत माजवण्यात आली होती. मात्र, पुणे पोलीसांकडून घेण्यात आलेल्या कॉम्बीग ऑपरेशनमुळे मोठ्या प्रमाणात शहरातील विविध भागातील भाईंना पकडण्यात आले होते. आत्ता मात्र, पुन्हा एकदा कोयता गँगकडून शहारत दहशत माजविण्यात येत आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी गोळीबार करून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. वर्चस्ववादातून दोन गटात तुफान राडा झाला असून या राड्यात सराईत गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यात14 दुचाकी, 4 चारचाकी आणि एका तीनचाकी वाहनाचा समावेश आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या राड्यात लोखंडी हत्याराने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच पांडव नगर परिसरात फायरिंग झाल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे. मात्र, पोलीसांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. एवढंच नव्हे तर परिसरातील नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊनही कारवाई होत नसल्याची चर्चा पांडवनगर परिसरातील नागरिक करत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.