Fashion Show In Nagpur: LGBTQ कम्युनिटीसाठी प्राईड कार्निव्हलमध्ये 'फॅशन शो'चे आयोजन - Fashion Show at Pride Carnival
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : येथे LGBTQ कम्युनिटीसाठी प्राईड कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निव्हलमध्ये समलैंगिक तरुण-तरुणींसाठी 'फॅशन शो' चे विशेष आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी जमली होती. देशभरातील LGBTQ कम्युनिटीकडून जून हा महिन प्राईड महिना म्हणून साजरा केला जातो. म्हणून सारथी ट्रस्टने प्राईड महिन्याच्या समारोपाच्या निमित्ताने LGBTQ समुदायातील लोकांसाठी 'फॅशन शो'चे आयोजन केले होते. यात नागपुरातील समलैंगिक तरुण-तरुणी आकर्षक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांत समाजाचा समलैंगिक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत आहे. समलैंगिक लोकांचा समाज खुल्या मनाने आता स्वीकार करू लागला आहे. यावर LGBTQ कम्युनिटीने समाधान व्यक्त केले आहे. समलैंगिक समुदायांचे मनोबल वाढावे, त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे याकरिता येणाऱ्या प्रत्येक वर्षात असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.