छत्रपती संभाजीनगर - पुणे महामार्गावर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा केला निषेध - छत्रपती संभाजीनगर
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 19, 2023, 10:12 PM IST
छत्रपती संभाजीनगर (गंगापूर) Farmer Protest: शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दूधव्यवसाय, याच दुधाचे भाव मागील काही दिवसापासून कमी झाले आहे. पशुखाद्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळं दूध धंदा तोट्यात आला आहे. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. दुधाला पन्नास रुपये हमीभाव देण्यात यावासाठी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर नवीन कायगाव येथे शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Protest) करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या फोटोवर दूध टाकून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर रास्ता रोको आंदोलनामुळं काही काळ महामार्गावरील वाहतूक संतगतीने सुरू होती.
यांचा होता सहभाग : दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, विनोद काळे, उद्धव काळे, संदीप उंबरकर, राजेंद्र इष्टके, संपत रोडगे नंदकिशोर बगल, आदींसह कायगाव, गणेशवाडी, लखमापूर, अमळनेर, धानोरा, आगरवाडगाव, गळींब, पखोरा, भेंडाळा, जामगाव बगडी आदी गावातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल प्रशासनाच्या वतीनं मंडळ अधिकारी बेडवाल, जिल्हा निबंधक (दूध सहकारी संस्था) संघाचे कर्मचारी उपस्थित होते.