Bharat Gogawale : न्यायालयाने मुदतवाढ दिली असली तरी, निर्णय आमच्या बाजूने लागेल - भरत गोगावले - भरत गोगावले
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) गटातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या सुनावणी कडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले ( Pratod Bharat Gogaon ) यांनी न्यायालयाच्या सुनावणीवर आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने मुदतवाढ दिली असली, तरी निर्णय आमच्या बाजूने लागेल असा मला आशावाद आहे. जो काय निर्णय असेल त्यात अपात्रतेची कारवाईच असली तरी तो आम्हाला येईल मान्य राहील, असे गोगावले म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST