thumbnail

By

Published : Jun 11, 2023, 10:27 PM IST

ETV Bharat / Videos

Supriya Sule welcome: सुप्रिया सुळे म्हणतात बॅनर, फटाके नको; मात्र...

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्षा झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मला फटाके तसेच बॅनरबाजी ही चुकीची वाटते, असे त्या म्हणाल्या. मात्र, असे असतानाही आज धनकवडी येथे सुळे यांचे फटाके फोडत आणि डीजे लावत स्वागत करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. या घोषणेनंतर पक्षाचे नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात लोकशाही असून इथे जे निर्णय होतात ते सगळ्यांना विचारूनच होतात, असे त्या म्हणाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.