Eknath Khadse On Raver Lok Sabha : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद उघड, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली 'ही' इच्छा - काँग्रेस पक्ष
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 3, 2023, 8:15 AM IST
जळगाव Eknath Khadse On Raver Lok Sabha : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसची असल्याचा दावा केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना रावेर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रत्येकवेळी अपयश आलंय. त्यामुळं रावेरची जागा राष्ट्रवादीला देण्याचा आग्रह एकनाथ खडसेंनी केला. तसंच रावेर लोकसभेचं धनुष्यबाण उचलण्यास मी तयार असल्याचंही खडसे म्हणाले. राष्ट्रवादी पक्षालाही जागा मिळाली अन् पक्षानं जर मला संधी दिली, तर मी लोकसभा निवडणुकीचा धनुष्यबाण पेलण्यास तयार असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.