MLA Pratap Saranaik पाहा, आमदार प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ, 11 कोटींच्या मालमत्तेचे अधिकार ईडीला
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटात असलेले आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. प्रताप सरनाईक MLA Pratap Saranaik यांच्यावर असलेल्या एनएसईएल घोटाळ्यात संबंधित ईडी चा तपास पुर्ण झाला. असुन ईडीकडून ताब्यात घेण्यात आलेले ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील दोन फ्लॅट आणि मीरारोड येथील जमीन अशी 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता आता ईडी जप्त करणार ED will confiscate MLA Pratap Saranaik property आहे. ईडीच्या ताब्यात असलेली सरनाईक यांची मालमत्ता विकण्याचे वापर करण्याचे किंवा कोणताही व्यवहार करण्याचे अधिकार आता ईडीला असणार आहेत. प्रताप सरनाईक हे आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात अनेकदा आर्थिक घोटाळे मनी लॉंड्रीन प्रकरणाचे आरोप केले होते. आणि त्या विरोधात सोमय्या यांनी ईडीमार्फत चौकशी लावली MLA Pratap Saranaik property होती. त्यातील एनएसईएल प्रकरणात सरनाईक यांचा आर्थिक घोटाळा समोर आल्याने ईडीकडुन याचा तपास सुरु होता. तो तपास आता पुर्ण झाल्याने सरनाईक यांच्या आर्थिक घोटाळ्यातील कोटींची संपत्तीचा ताबा आता ईडी घेणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST