दादरमधील भरतक्षेत्र साड्यांच्या दुकानावर ईडीची छापेमारी सुरू - साड्यांच्या दुकानावर ईडीची छापेमारी सुरू
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 6, 2023, 4:34 PM IST
|Updated : Dec 6, 2023, 5:27 PM IST
मुंबई ED Raids On Bharatkshetra: विविध कंपन्या, उद्योगानंतर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आता दुकानांवर धाड घालत असल्याचे उघडकीस आले आहे. 133 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील पाच ठिकाणी आज सकाळपासून छापे टाकले आहेत. 2019 मध्ये भोईवाडा पोलीस ठाण्यात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर ED ने 2022 मध्ये ECIR दाखल केला. व्यापारी मनसुखलाल गाला आणि त्यांच्या सीए यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. (Enforcement Directorate) भरतक्षेत्र साडीचे दुकान हे वसंत स्मृती या बिल्डिंगमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत स्मृती ही पाच मजली बिल्डिंग भाजपाची आहे. या इमारतीत दोन मजल्यांवर भरतक्षेत्र हे साडीचे दुकान विस्तारलेले आहे. (Bharatkshetra Saree Shop)
भरतक्षेत्रच्या फ्लॅटवर देखील छापेमारी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरतक्षेत्र नावाची दादरमध्ये तीन साड्यांची दुकाने आहेत. मात्र मानसुखलाल गाला यांच्या भरतक्षेत्र या साडीच्या दुमजली दुकानावर छापेमारी सुरू आहे. या दुकानासमोरच असलेल्या त्रिशला सहा मजली इमारतीत भरतक्षेत्र नावाने पहिल्या मजल्यावर दोन आणि दुसऱ्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. या फ्लॅटसवर देखील ईडीचे अधिकारी छापेमारी करत आहे. (ED Raid)
भागीदारानेच केली तक्रार: ED च्या ECIR नुसार, मनसुखलाल गाला आणि अरविंद शाह यांनी बांधकाम कंपनी एसबी डेव्हलपरची स्थापना केली आणि कंपनीमध्ये 50-50 टक्के भागीदारी केली होती. अरविंद शाह यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, 2019 मध्ये मनसुखलाल गाला यांनी त्यांच्या विरुद्ध कट रचला आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून कंपनीतील त्यांचा हिस्सा 50 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आणला.