माझ्यावरील ईडीची केस रद्द झालेली नाही, ज्या बातम्या आल्यात त्या चुकीच्या- छगन भुजबळ
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 13, 2023, 7:42 PM IST
नागपूर ED case against Chhagan Bhujbal : माझ्यावरील ईडीची केस रद्द झाल्याची जी चर्चा कालपासून बऱ्याच वर्तमानपत्रातून सुरू आहे, ती अत्यंत चुकीची आहे. ईडीने दाखल केलेली केस ही अजून सुरू असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. (ED case on Chhagan Bhujbal) महाराष्ट्र सदन केस त्याच्यातून डिस्चार्ज झालो. (Maharashtra Sadan case) त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, त्याप्रमाणे माझ्यावरील केसेस निकाली निघाल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलीय. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
सुनील शुक्रे प्रकरणी काय म्हणाले भुजबळ? निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रेंकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. (Chairman Commission for Backward Classes) याला विरोध देखील होत आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकाचे मत हे वेगळे असू शकते. (Sunil Shukre case)
उध्दव ठाकरे यांचं स्वागत : उद्धव ठाकरे माझ्या घरी पेढा खायला आले तर आनंदच आहे. पेढा काय घेऊन बसलात. त्यांना आवडेल तसं जेवण देऊ असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. ते कधीही येऊ शकतात, असंही ते म्हणाले.