Viral Video : ...अन् अंड्यातून पिल्लं बाहेर येऊ लागली, पाहा व्हिडिओ - Viral Video
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर: उन्हाळ्या म्हंटले की कुणालाही नको- नकोसा वाटतो. विदर्भात उन्हाळ्याचे एक भन्नाट सत्य बाहेर आले आहे. उन्हामुळे अंड्यातून पिल्ले आपोआपचं बाहेर येऊ लागले आहेत. सध्या विदर्भात तापमान चांगलेच वाढले आहे. गेले अनेक दिवस तापमान सतत 42 ते 43 अंशांच्यावर आहे. अशात अंगांची लाही-लाही होईल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले असताना, आता उन्हामुळे अंड्यातून कोंबडीचे पिल्ल बाहेर पडू लागले आहेत. हा प्रकार कोंबडीचे अंडी घेऊन जात असलेल्या एका गाडीत घडला आहे. चालत्या गाडीत अंड्यांमधून तापमानामुळे कोंबड्याची पिलं बाहेर यायला लागली. कोंबडीची पिलं बाहेर येत असल्याचे एक व्हिडिओ वायरल झाला आहे. दुपारी नागपूरवरुन भंडाऱ्याकडे जाणाऱ्या एका अंड्याच्या गाडीत हा प्रकार घडला आहे. नागपूरातील महामार्ग पोलीसांनी हा व्हिडिओ शुट केले आहे. अंड्याची ती गाडी नागपुरातून भंडाऱ्यातील हॅचरीजमध्ये जात असताना ही घटना समोर आली. मुळात अंड्यातून पिलं बाहेर येण्यासाठी उब मिळणे गरजेच, मात्र तापमानामुळे अंडीला कोंबळी शिवाय तापमानातील ऊब मिळून पिल्ल बाहेर येत आहे.