Director Explanation On CBI Raid: बीडच्या मुंगी साखर कारखान्यावर सीबीआयची छापेमारी; संचालकाचे माध्यमांसमोर स्पष्टीकरण - ShivParvati sugar factory CBI raid
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18132875-thumbnail-16x9-sugarfactory.jpg)
बीड : धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली. घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या सर्व प्रकरणानंतर कारखान्याचे संचालक पांडुरंग सोळंके यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे.
तपास यंत्रणेला सहकार्य करू : धारूर तालुक्यातील मुंगी गावच्या शिवारात पांडुरंग सोळंके यांचा शिवपार्वती कारखाना आहे. परंतु अद्याप हा कारखाना सुरू नाही. मध्यंतरी कारखान्यासाठी पैसे हवे होते आणि यासाठी सोळंके यांनी नंदकुमार तासगावकर यांच्याशी 'एमओयु' साईन केला. मात्र, याच माध्यमातून सोळंके यांची बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक झाली. तासगावकर कुटुंबीयांनी साखर कारखान्याकरता पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून 106 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. पण, याची कल्पना पांडुरंग सोळंके यांना नव्हती आणि आता याच प्रकरणात सीबीआयकडून सोळंकेंची चौकशी सुरू आहे. सर्व तपास यंत्रणेला सहकार्य करू; मात्र यातील दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.