Sharad Pawar भर कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक थांबवले भाषण.. वळसे पाटलांना करावं लागलं असं काही.. पहा व्हिडीओ - dilip valse patil read Sharad Pawar speech
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar )यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील शरद पवार यांनी आज शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला हजेरी लावली. आजारी असलेले पवार यांच्या हाताला बँडेज तर चेहऱ्यांवर आजार पणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांचा घसा बसलेल्या असल्याने पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले. साईबाबांच्या शिर्डीत दोन दिवशीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले की. डॉक्टरांनी आपल्याला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांची भाषणे ऐकून घेतली आहेत. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल अशी आशा असल्याचेही पवार म्हणाले आहे. यावेळी त्यांचा आवाज क्षीण असल्याचे दिसून आले. त्यानंतर शरद पवार यांचे लिखित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. शिर्डीच्या कार्यक्रमानंतर शरद पवार पुन्हा मुंबईकडे रवाना झाले असुन ते ब्रीच कँडी रुग्णालयात भरती होणार आहे. त्यांच्यावर अजून दोन चार दिवस उपचार होणार राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST