Navratri 2022 : पायदळ यात्रा करत ज्योत आणण्यासाठी अनेक तरुण मंडळी श्रीक्षेत्र तुळजापूरकडे रवाना, पहा व्हिडिओ - पायदळ यात्रा करुन ज्योत आणण्यासाठी
🎬 Watch Now: Feature Video
उसमानाबाद उद्यापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पायदळ यात्रा करुन ज्योत आणण्याची (carry the flame on foot Navratri) अनेक वर्षानुवर्षांची परंपरा लाभली आहे. श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणाहून पायदळ यात्रा करुन, ज्योत आणण्यासाठी अनेक वर्षांपासुनची परंपरा चालत आली आहे. यासाठी अनेक युवक पायदळ यात्रा करुन, ज्योत आणण्यासाठी तुळजापूर नगरीत (Many young people left for Srikshetra Tuljapur) दाखल होत आहेत. घटस्थापनेच्या पूर्वी ही ज्योत श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर येथून पेटवून आणली जाते. श्री तुळजाभवानी मंदिरातून पेटवून आणलेली ज्योत आपल्या गावात किंवा शहरात आल्यानंतर ज्योतीचे वाजत गाजत भव्य स्वागत केले जाते. पुढील नऊ दिवस ही ज्योत तेवत ठेवली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, राज्यातील अनेक तरुण मंडळी पायदळ यात्रा करुन, ज्योत आणण्यासाठी आज दिवसभर श्री क्षेत्र तुळजापुर नगरीत जय भवानी जय शिवाजी,अंबे आईचा उदो उदो च्या जय घोषात श्री क्षेत्र तुळजापूर नगरी मध्ये दाखल होतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST