Ajit Pawar Satara Visit: उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक साताऱ्यात, दंगल झालेल्या पुसेसावळी गावाला दिली भेट - अजित पवार सातारा भेट
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 18, 2023, 6:32 PM IST
सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी अचानक साताऱ्यात दाखल झाले. त्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. साताऱ्यातून अजित पवार थेट पुसेसावळी गावात गेले. (Ajit Pawar visit to Satara) दंगलीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. अजित पवारांच्या दौऱ्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झाले. साताऱ्यातून ते खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात गेले. दंगलीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दंगलीत नुकसान झालेल्या मशिदीची पाहणी केली. (Deputy Chief Minister Ajit Pawar) त्यानंतर पुसेसावळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेऊन सर्वांना सलोखा राखून सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले. साताऱ्यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीमागे (Satara riots) 'पीएफआय'शी संबंधित लोकांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच संबंधितांची चौकशी करून त्यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.