भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचे दोन्ही हात तुटले, पाहा व्हिडिओ - Bike hit woman
🎬 Watch Now: Feature Video
देहरादूनच्या दलनवाला पोलीस स्टेशन परिसरात अतिवेगाने वाहने चालवण्याचा कहर दिसून ( Dehradun bike accident ) आला. येथील मॉडेल कॉलनीमध्ये भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या तरुणाने महिलेला धडक ( Bike hit woman ) दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. त्यावेळी दुचाकीचा वेग एवढा होता की महिला दुचाकीमुळे लांबपर्यंत खेचली ( Dehradun road accident ) गेली. स्थानिक लोकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. दुसरीकडे अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ ( Dehradun hit and run case ) काढला. महिलेच्या कुटुंबीयांनी दुचाकीस्वाराविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शक्ती सिंह रा. मॉडेल कॉलनी यांनी फिर्याद दिली. त्यांची पत्नी रेणू मंगळवारी सायंकाळी डेअरीतून दूध आणण्यासाठी जात असताना भरधाव दुचाकीने रेणू यांना धडक दिली. धडकेमुळे रेणूचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. ऑपरेशननंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST