साईबाबांच्या दर्शनाकरिता गुरूभक्तांची गर्दी ; दत्तजयंतीनिमित्त राज्यभरातून 140 पालख्या शिर्डीत दाखल
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी : Datta Jayanti 2023 देशभरात आज दत्तजन्म उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रद्धेनं आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात दत्तमुर्ती ठेवुन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा गुणगान केले जाते. आज सांध्यकाळी 6 वाजता श्रीदत्त जन्माचा उत्सव साई मंदिरात साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. साईबाबांना श्रीदत्त अवतार मानत या पावन दिवशी देशभरातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 140 पाय पालख्या घेऊन भाविक दत्तजयंती निमित्तानं शिर्डीत दाखल झाले आहेत. आज दत्तजयंती निमित्तानं साईबाबांना सुवर्ण अलंकारानी मढवले आहे. दत्त जयंती असल्यानं भाविकांना साईच्या दर्शनासाठी किमान तीन ते चार तास लागत आहेत. शिर्डी साईबाबा समाधी मंदिर तसेच चावडी, द्वारकामाई गुरूस्थान साई मंदिर परिसरातील दत्त मंदिराची फुलांनी सुंदर सजावट केली आहे.