Crocodile Video : पुराच्या पाण्यातून मगर आली गावात! लोकांचे धाबे दणाणले; पाहा व्हायरल व्हिडिओ - Crocodile
🎬 Watch Now: Feature Video
लक्सर - उत्तराखंडचा मगरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लक्सरमधील मलकापूर गावचा असल्याचा दावा केला जात आहे. येथे एक मगर गावात घुसली. ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. लक्सरमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच सर्वत्र पाणी साचले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, गावात पाणी साचलेले आहे आणि पाण्याच्या मध्यभागी एक मगर फिरत आहे. आजूबाजूचे लोक मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी वनविभागाला न कळवता आपणहूनच मगरीला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. लक्सर आणि आसपासची अनेक गावे नद्यांच्या जवळ आहेत. अनेकदा नद्यांमध्ये जास्त पाणी झाले की मगरी लोकवस्तीत पोहोचतात. अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाही. या आधीही अनेक गावात मगरी आल्या आहेत. दरम्यान हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचेही सांगण्यात येत आहे. या व्हिडिओच्या ठिकाणाबद्दल ईटीव्ही भारत कोणतीही पुष्टी करत नाही.