Cricket World Cup २०२३ : पाकिस्तानवरील विजयानंतर कोल्हापुरात चाहत्यांचा जल्लोष, पाहा व्हिडिओ - क्रिकेट विश्वचषक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:56 PM IST

कोल्हापूर Cricket World Cup २०२३ : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर भारतानं ७ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर कोल्हापुरात क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडत एका महिन्याआधीच दिवाळी साजरी केली. सामन्यानंतर कोल्हापूर शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी चौकात क्रिकेट चाहते जमले. त्यांनी चौकात विजयाचा आनंद साजरा करत फटाके फोडले. क्रिकेट प्रेमींच्या हातात १९८३ चा विश्वचषक जिंकलेल्या कपिल देवच्या टीमचं आणि २०११ सालचा विश्वचषक जिंकलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या टीमचं छायाचित्र होतं. आता कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात यंदाच्या विश्वचषकावर भारतानं नाव कोरून दिवाळीचं गिफ्ट द्यावं, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.