कोरोनाच्या नवीन व्हेरियंटला घाबरून जाऊ नये, राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज - आरोग्य मंत्री तानाजी सावंत - कोविड अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 22, 2023, 11:03 PM IST
पुणे Corona Virus Update : कोरोना विषाणूच्या नवीन 'जेएन-वन' या नव्या उपप्रकाराचा संसर्ग अनेक देशात वाढत आहे. (JN One) भारतात देखील केरळ तसेच महाराष्ट्रात या 'जेएन-वन' या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढल्याने आरोग्य यंत्रणेकडून सर्वच राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. (Tanaji Sawant on Covide) राज्यात देखील आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य यंत्रणा तसेच आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली. (Health Minister) या बैठकीत राज्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती घेण्यात आली आहे. (Tanaji Sawant) राज्यात 'जेएन-वन' या नव्या उपप्रकाराचा एक रुग्ण ॲक्टीव्ह असून या नव्या व्हेरीयंट बाबत घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.
'जेएन-वन' बाबत बैठक: पुण्यात आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काल राज्याचे मुख्यमंत्री मी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची कोरोनाच्या या नव्या 'जेएन-वन' बाबत बैठक झाली. राज्यात कोरोनाच्या या नव्या 'जेएन-वन' व्हेरीयंटचा एक ॲक्टिव्ह रुग्ण असून हा व्हेरीयंट सौम्य आहे. राज्यातील जनतेला आवाहन आहे की, या नवीन व्हेरीयंटला घाबरून जाऊ नये. पण काळजी घेतली पाहिजे. कुठलेही निर्बंध लावले जात नाहीये; पण नागरिकांनी गर्दीत जातना तसेच बाहेर फिरत असताना खबरदारी घेतली पाहिजे. ज्यांना आजार आहे त्यांनी गर्दीत जाणे टाळले पाहिजे, असं देखील यावेळी सावंत म्हणाले.