Married Women Cricket Tournament : कर्नाटकात विवाहित महिलांची क्रिकेट स्पर्धा; देशातील पहिलाच प्रयोग - चिअर गर्ल्स
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 6, 2023, 8:58 AM IST
कोडागू (कर्नाटक) Married Women Cricket Tournament : पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे सामान्य आहे. पण कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील माडीकेरी तालुक्यातील चेत्तल्ली गावात विवाहित महिलांची क्रिकेट स्पर्धा दिमाखदारपणे पार पडलीय. जिल्हास्तरीय स्पर्धेत विवाहित महिलांनी सहभाग घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. अवर क्लब ऑफ चेट्टल्ली तर्फे विवाहित महिलांची स्पर्धा दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. देशात प्रथमच अशा विवाहित महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मालदारे संघ चॅम्पियन ठरला तर मास्टर ब्लास्टर संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.
15 विवाहित महिलांचे संघ सहभागी : कौटुंबिक कामे आणि दैनंदिन कामे बाजूला ठेवून क्रिकेटच्या पेहरावात महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी मैदानावर क्रिकेटची बॅट धरून षटकार आणि चौकार मारून क्रिकेटचा आनंद लुटला. महिलांनी बनवलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि चिअर गर्ल्सच्या मंत्रमुग्ध नृत्याविष्कारानं चेत्तल्ली हायस्कूलच्या मैदानात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रत्येकी 6 षटकांचं सामने खेळवले गेले. या स्पर्धेत 25 वर्षांवरील एकूण 15 विवाहित महिला संघ सहभागी झालं होतं. अंतिम सामन्यात, मास्टर ब्लास्टनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 4 षटकांत 23 धावांचे लक्ष्य ठेवले. वेळेअभावी अंतिम सामना 4 षटकांचा करण्यात आला. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मालदरे संघाने 2.3 षटकांत विजय मिळवला. तृ