Corruption Dahi Handi: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी, पाहा व्हिडिओ - मनसे कार्यकर्त्यांनी फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 6, 2023, 8:47 PM IST
ठाणे Corruption Dahi Handi : मनसे कार्यकर्त्यांनी आज गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडलीय. तसंच उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा देखील त्यांनी वाचलाय. यंदाच्या वर्षी महापालिकेला ८०० कोटी रुपयांचे बजट मंजूर केलं. मात्र त्यानुसार नागरी सुविधा मिळत नाही. महापालिकेच्या बहुतांश विभागात भ्रष्टाचार सुरूय. या पार्श्वभूमीवर आज आम्ही महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली, असं मनसे पदाधिकारी मनोज शेलार यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे नोटांनी भरलेली दहीहंडी फोडल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरलाय. (corruption dahi handi in Thane by mns) ठाणे जिल्ह्यात ६ महापालिका आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार उल्हासनगर महापालिका क्षेत्रात होत असल्याचा आरोप होतोय. या महापालिकेतील जवळपास सर्वच विभागात भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांकडून कायमच केला जातोय. विशेष म्हणजे मनसे कार्यकर्त्यांनी अनेकवेळा भ्रष्टाचाराची पोलखोल करत मोर्चे, उपोषणं आणि आंदोलनं केली. मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांनी फक्त वेळ मारून नेण्यापुरती कारवाई केली, असं मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी सांगितलंय.