केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर...; मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा - जातीनिहाय जनगणना

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 3:27 PM IST

नागपूर Mallikarjun Kharge  Reaction : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी नागपूर दौऱ्यावर (Mallikarjun Kharge Nagpur Tour) आले आहेत. यावेळी त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत संवाद साधला. भाजपानं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी (Rahul Gandhi )यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे. यावर बोलताना मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, त्यांनी जी तक्रार केली असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ. भाजपा कायमचं तुष्टीकरनाचं राजकारण करत आलंय. आम्ही तुष्टीकरण करत नाही तर, आम्ही सेक्युलर आहोत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय तातडीने घेईल. काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार अविनाश पांडे (Avinash Pandey) यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खरगे नागपूरला आले आहेत.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.