Rahul Gandhi Rides A Bicycle भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी चालविली सायकल - Rahul Gandhi Rides A Bicycle During
🎬 Watch Now: Feature Video
मध्य प्रदेशात सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मध्य प्रदेशातील पदयात्रेच्या सहाव्या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदयात्रींचा ताफा इंदूरहून उज्जैनला आज रवाना झाले. वाटेत एक सायकलस्वारही या यात्रेत सामील झाला आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष आपल्या सायकलचे पॅडल मारताना दिसले. Rahul Gandhi Rides A Bicycle इंदूरच्या बडा गणपती चौकातून हा प्रवास सुरू झाला होता. काँग्रेसने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 4 डिसेंबरला राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ही यात्रा 12 दिवसांत पश्चिम मध्य प्रदेशातील माळवा निमार भागात 380 किलोमीटरचे अंतर पार करेल. महाराष्ट्रातून मार्गक्रमण केल्यानंतर ही यात्रा 23 नोव्हेंबर रोजी बुरहानपूर जिल्ह्यातील बोडार्ली गावातून मध्य प्रदेशात दाखल झाली, ज्याला दक्षिणेचे द्वार म्हटले जाते.गेल्या सहा दिवसांत या यात्रेने मध्य प्रदेशात अर्ध्याहून अधिक प्रवास पूर्ण केला आहे. यादरम्यान गांधींच्या नेतृत्वाखाली मोर्चाचा ताफा बुरहानपूर, खंडवा, खरगोन आणि इंदूर जिल्ह्यातून गेला. Congress MP Rahul Gandhi Rides A Bicycle During
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST