Maharashtra Weather राज्यात नोव्हेंबर महिन्यात किती असेल तापमान? जाणून घ्या खुद्द हवामान विभाग प्रमुखांकडून - Maharashtra Weather in November
🎬 Watch Now: Feature Video
पुणे नोव्हेंबर महिन्यात राज्यभरात हवामानाची काय परिस्थिती असणार आहे याबाबत हवामान विभाग प्रमुख अनुपम कश्यपी Anupam Kashyapi यांच्याशी ईटीव्ही भारतने खास बातचीत केली आहे. राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. maharashtra weather update. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटेचा गारवा वाढला असून दुपारी उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. pune temperature. पुण्यामध्ये सरासरी तापमानाच्या तुलनेमध्ये 3.2 अंशाने घट झाल्याचे दिसून आले आहे. हवामान खात्याकडून मिळाल्या माहितीनुसार, राजस्थान मधून येणारे थंड वारे आणि हिमालय पर्वतरांगेमध्ये सुरू असलेली बर्फदृष्टी याचा एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रातील तापमान कमी होत चालले आहे. याबातच्या बातचीतीचा पाहा हा खास रिपोर्ट.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST