CM Shinde will visit Pune : मुख्यमंत्री शिंदे दगडूशेठ गणपती मंदिरात करणार महाआरती, 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत असून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची महाआरती करणार आहेत. त्याचबरोबर ते पुण्यातील विविध कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर पुण्यात त्यांचा सर्वाधिक विरोध झाला होता. तसेच, शहरातील सर्वच शिवसैनिक एक असून कोणीही शिंदे गटात जाणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. परंतु, त्यानंतर शिवसेनेचे हडपसर येथील नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात सहभागी झाले. त्यांच्याबरोबर अनेक शिवसैनिक हे शिंदे गटात सहभागी झाले होते. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे यांचा हा पुण्यातला पहिलाच जाहीर कार्यक्रम असेल. 1 ऑगस्टला दुपारी ते हांडेवाडी इथे एका फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करतील. शिंदे गटात सामील झालेले माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या निधीतून हे मैदान उभारण्यात येणार आहे. या मैदानाचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देतील. गणपतीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST