Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांनी केली मेट्रो 3 मार्गाची पाहणी, म्हणाले येत्या डिसेंबरपर्यंत ... - मेट्रो 3
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो 3 च्या बांधकामाची पाहणी केली आहे. पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा प्रकल्प भूमिगत आहे. या प्रकल्पात एकूण २७ स्थानके आहेत. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ही गरज देखील पूर्ण होणार आहे. मेट्रो-३ मार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो ३ चा आरे ते बीकेसी स्थानक टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. प्रवाशांचा या मेट्रो -3 रेल्वे मार्गामुळे वेळ वाचणार आहे. तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.