Eknath Shinde Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अयोध्या नगरीत जोरदार स्वागत! - Eknath Shinde was warmly welcomed in Ayodhya
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18209519-thumbnail-16x9-cmayodhya.jpg)
अयोध्या (उत्तर प्रदेश) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पुर्ण मंत्रिमंडळ सध्या अयोध्या दौऱ्यावर आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत. मुख्यमंत्री अयोध्येत पोहचल्यानंतर त्यांच्ये मोठ्या जल्लोषात स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांचेही मोठी रॅली काढत जोरदार स्वागत केले आहे. दरम्यान, सर्वच मंत्रिमंडळ राम मंदिरात दाखल झाल्यानंतर येथे आरती झाली. त्या आरतीलाही मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील महंतांनी केलेला सत्कार स्वीकारला. यावेळी राम मंदिरातील सर्व साधू-संत उपस्थित होते. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही राम भक्त असल्यानेच आम्हाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण मिळाला आहे अशी भावना व्यक्त केली आहे.