Chandrayaan 3 Landing: भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा दिवस; चंद्रयान करणार चंद्रावर लँडिंग - चंद्रयान 3

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 5:45 PM IST

ठाणे : आज भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. कारण चंद्रावर लँडिंग करण्याचा पहिला प्रयत्न भारताचे चंद्रयान ३ करणार आहे. सायंकाळी ठीक ६.०४ वा. लँडिंगचा पहिला प्रयत्न होणार असल्याने देशात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले आहे. याविषयी सांगताना ज्येष्ठ खगोलशास्त्री दा कृ सोमण यांनी संपूर्ण अभियानाविषयी विस्तृत माहिती दिली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) या अंतराळ संस्थेचे चंद्रयान २ हे अंतराळ यान २२ जुलै २०१९ रोजी उड्डाण घेऊन ६ सप्टेंबर २०१९ रोजी शेवटच्या क्षणी लँडिंग करताना कोसळले. या घटनेने भारताच्या अंतराळ अभियानाला थोडी खीळ बसली; परंतु आपल्या वैज्ञानिकांनी खचून न जाता पुन्हा एकदा उभारी घेऊन चंद्रयान ३ ची जोमाने तयारी केली आणि १४ जुलै २०२३ ला अवकाशात उड्डाण केले. आज या चंद्रयान ३ चे १७५२ किलोग्रॅम वजनाचे विक्रम नामक लँडर मॉड्युल चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत. याच लँडरमध्ये २६ किलो वजनाचा प्रज्ञान नावाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठाभागाचे परीक्षण सुरू करणार आहे. ही लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुव परिसरात होणार असून असे करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. 'प्रज्ञान लँडर' 'Moon Quakes' मोजणार आहे. अत्यंत कमीत कमी किमतीत हे अभियान राबविले जात असून हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी संपूर्ण जगाचे डोळे अवकाशकडे लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.